सेलू तालुक्यातील हातनूर, साळेगाव व रायपुर या तीन गावाच्या शेतातील लाईट दुरुस्त न केल्यास उपोषणाचा इशारा.
——————————————
सेलू /प्रतिनिधी (अबरार बेग)
सेलू तालुक्यातील मौजे हातनूर, साळेगाव, व रायपुर, या गावचा वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे तसेच त्याबाबत आपल्या कार्यालयाचे दुर्लक्ष याबाबत अनेक वेळा निवेदने सादर केली परंतु आपण गेल्या तीन महिण्यापासुन त्याची कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत असून आपण या प्रकरणी कोनीही लक्ष देण्यास तयार नाहीत.
नाईलाजास्तव आम्हाला आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागत आहे ज्याला आपणच जबाबदार आहात.
करीता आम्ही तीन गावचे शेतकरी आपल्या कार्यालयासमोर सोमवार दि.07 सप्टेंबर रोजी लाक्षणीक उपोषणास बसत असल्याबाबत हे निवेदन देत आहोत. उपोषणास बसल्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस सर्वस्वी आपणच जबाबदार राहाल दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले
उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
मौजे हातनूर गावातील पूर्ण दुरुस्ती केल्याचे दाखवून कोणतेही काम न करता
बिल उचचले त्याची चौकशी होऊन संबंधीतावर कार्यवाही करण्यात यावी. हातनूर, रायपुर, साळेगाव या गावातील ए.जी.ई. लाईनचे खांब वाकलेले असून त्यापैकी काही खांब पडलेले सुध्दा आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, वालूर-हातनूर ए.जी.ची वेगळी नविन लाईन गेल्या दोन वर्षापासून उभी केलेली
आहे ती तात्काळ सुरु करण्यात यावी.
शेतामध्ये रात्रीसाठी एक फेज ठेवून शेतातील लाईट राहण्याची व्यवस्था करावी. हातनूर येथील मंदिराच्या पाठीमागील डि.पी.ची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. पाबाबत आम्ही गावकऱ्यांनी दिनांक १३/०८/२०२० रोजी अर्ज देऊन वरील कामे करण्या बाबत विनंती केली होती व कामे न झाल्यास दिनांक २४/०८/२०२० रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी मा.उपकार्यकारी अभियंता, सेलू यांनी वरील कामे करण्यास दिनांक ३०/०८/२०२० पर्यंत वेळ मागीतला होता. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन गावकऱ्यांनी आजपर्यंत वरील कामे होण्याची वाट पाहिली. परंतु अद्याप पर्यंत वरील कामांपैकी एकही काम करण्यात आलेले नसल्याने व कामासंदर्भात उडवा उड़वीची उत्तरे मिळत असल्याने आम्ही गावकरी दि. 07 सप्टेंबर शुक्रवार पासून म.रा.विद्युत वितरण कंपनी,सेलू यांच्या कार्यालया समोर उपोषणास बसत आहोत. सदरील उपोषण दरम्यान होणाऱ्या परीणामांची सर्वस्वी जवाबदारी आपणावर राहील. असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर दत्तराव नागोराव आंधळे, सतिश लक्ष्मणराव काकडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत उपोषणाला सर्व गावकरी हातनूर, रायपुर, साळेगाव गावकऱ्यांचा पाठींबा आहे.
------------------------<Next-Page>-----------------------
सेलू पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न | Parbhani-Selu News Live | Gaonvichar News Live.
📲📡⬆👆⬆👆
*सविस्तर बातमी साठी लिंक वर क्लिक करा.*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
No comments:
Post a Comment