*स्वस्त धान्याचा काळाबाजार करणार्यांवर कारवाईची मागणी*
*शिवसेना शहरप्रमुख बालाजी दहे यांनी मानवत तहसिलदारांना केली मागणी*
मानवत, बातमीदार [ इरफान बागवान ]
ता.२५ शहरातून होत असलेल्या स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख बालाजी दहे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मानवत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मानवत पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रूढी शिवारात २५ टन तांदळाचा ट्रक पकडला. पकडलेला ट्रक मानवत पोलिस ठाण्यात आणून लावण्यात आला.यानंतर पुरवठा विभागाची व पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून
पुरवठा विभागाने तपासणी साठी पकडलेल्या तांदळाचे नमुने न पाठवता अन्य तांदळाचे नमुने पाठवले आहेत पोलिस अधिकाऱ्यांनी पकडलेल्या ट्रक चालकाकडून कोणतीही माहिती मिळवली नाही. यामध्ये या ट्रकची बुकिंग कोणी केली, ट्रक मध्ये तांदूळ भरणारा कोण, विकत घेणारा कोण, त्याचे वजन किती, तो तांदूळ कुठे जात होता, मालाची पावती, याबरोबरच ट्रकची मालवाहतूक करण्याची क्षमता आदी प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
ट्रकमधील तांदळाचे नमुने पंचायत समक्ष काढून तपासणीसाठी पाठवावे. स्वस्त धान्याचा हा काळाबाजार करणाऱ्यांना कठोर कारवाई करावी, नसता शिवसेना रोडवर उतरून शिवसेना स्टाईलने अंदोलन करेल असा इशारा शहरप्रमुख बालाजी दहे यांनी दिला आहे.
निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख बालाजी रामभाऊ दहे,उपशहर प्रमुख अप्पा भिसे, राजु माहीपाल, दत्ता हारने, शे.खुदुस इत्यादी चे स्वाक्षऱ्या आहे.
सुपर
ReplyDelete