तालुका स्तरावर कोविड केअर केंद्र CCC सुरू.
—————————————————————
पाथरी प्रतिनिधी (गणेश जत्ती)
जागतिक कोविड 19 ची महामारी पसरलेली असल्यामुळे आपल्या देशात विविध ठिकाणी उपचार केंद्रे सरकारं मार्फत सुर करण्यात आली आहेत महानगरपालिका स्तरावर, जिल्हा स्तरावर कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आली आहेत त्याचाच एक भाग म्हणून तालुका स्तरावर कोविड केअर केंद्र CCC सुरू करण्यात आली आहेत
पाथरी तालुक्यात देखील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे देखील शासनाच्या वतीने कोविड केअर केंद्र सुरू केलेले आहे . आज पर्यंत पाथरी येथील कोविड केअर सेन्टर मधून एकुण 51 कोरोना बाधित रुग्णांनी उपचार पूर्ण झाल्यामुळे सुट्टी करण्यात आलेली आहे तसेच सध्या एकूण 18 रूग्ण तेथे उपचार घेत आहेत. पाथरी येथील कोविड केअर केंद्रामध्ये जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी,आणि डॉ. बाळासाहेब नागरगोजे जिल्हा शल्यचिकित्सक ,सामान्य रुग्णालय परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच तालुका स्तरावरावरील अधिकारी उमाकांत पारधी उपविभागीय अधिकारी पाथरी,
पाथरी तहसीलदार बी.एस कट्टे ,वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पाथरी, डॉ एस एन वाघ ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ चौधरी, गट विकास अधिकारी बी.टी.बायस, मुख्याधिकारी न.प. पाथरी कारभारी दिवेकर, पाथरी साहय्यक पोलीस निरीक्षक टिप्पलवाड आणि इतर अधिकारी नियोजन पूर्वक कोरोना चा फैलाव रोखण्यासाठीकाम करत आहेत . तसेच पाथरी शहर व तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की वैयक्तिक अंतर ठेवून च अत्यावश्यक दैनंदिन कामे करावीत ,विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावूनच बाहेर जावे , तसेच सर्दी , खोकला ,ताप व श्वसनासाठी त्रास असल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोरोना विषयक चाचणी करून पुढील उपचार डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावेत असे आव्हान करण्यात आले.
Better News
ReplyDeleteThanks.
DeleteThanks.
ReplyDelete